
भक्तांच्या घरी सात दिवस मुक्कामी राहिलेल्या गणरायाचे आज गौराई मातेसोबत विसर्जन करण्यात आले. मुंबई शहरात जागोजागी उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणरायांचे विसर्जन करण्यात आले. लाडक्या बाप्पाचे सात दिवस भक्तीभावाने पूजन करतानाच मुंबईकरांनी त्याला आपल्या नजरेत साठवून ठेवले. त्यामुळे बाप्पाला निरोप देताना आबालवृद्ध मुंबईकरांचे डोळे पाणावले. ‘बाप्पा चालले गावाला… चैन पडेना आम्हाला’ अशी भावना गणेशभक्तांनी व्यक्त केली. (फोटो – रुपेश जाधव)
































































