सहा महिन्यांपासून शटर डाऊन असलेल्या हॉटेल्स, फूडकोर्ट, रेस्टॉरंट आणि बार सोमवारपासून 50 टक्के क्षमतेने सुरू झाले आहेत.
मुंबईत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाच्या लक्षणासंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. तसेच लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात येत आहे.