छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष आढावा उपक्रम जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त आढावा उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी आयोगाच्या निर्देशांनुसार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी 30 सप्टेंबर 2020 ते दि. 31 ऑक्टोबर 2020 या काळात पूर्व पुनरिक्षण उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यात मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण आणि प्रमाणीकरण करणे, दुबार/समान नोंदी व छायाचित्र मतदार ओळखपत्राबाबतच्या त्रुटी दूर करणे, विभाग/भाग पुन्हा तयार करणे, मतदानाच्या क्षेत्राच्या/भागांच्या सीमेच्या पुनर्रचनेचे प्रस्ताव अंतिम करणे आणि मतदान केंद्रांची यादी मंजूर करणे ही कामे करण्यात येणार आहे. त्यानंतर 1 नोव्हेंबर 2020 ते दि. 15 नोव्हेंबर 2020 या काळात नमुना 1 ते 8 तयार करणे, पुरवणी आणि एकत्रिकृत प्रारूप यादी तयार करणे ही कामे करण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे पुनरिक्षण उपक्रमात 16 नोव्हेंबर 2020 रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यावर 16 नोव्हेंबर 2020 ते 15 डिसेंबर 2020 दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. यादरम्यान दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार आणि रविवारी विशेष मोहिम घेण्यात येणार आहे. दावे आणि हरकती 5 जानेवारी 2021 पर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. तर 14 जानेवारी 2021 पर्यंत प्रारूप मतदार यादीच्या मापदंडांची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी घेण्यात येणार आहे. तसेच डेटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. तर मतदार यादीची अतिम प्रसिध्दी 15 जानेवारी 2021 रोजी करण्यात येणार आहे. हा पुनरिक्षण कार्यक्रम 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम आयोगाच्या निर्देशांनुसार राबविण्यात येणार आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी कळविले आहे.