जात पडताळणीसारखीच दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची तपासणी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यभरात सुमारे दोन कोटी दिव्यांग बांधव आहेत असे सांगतानाच त्यांच्या अधिकृत नोंदणीसाठी राज्यभरात सर्वेक्षण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. त्यासाठी अकोला आणि ठाणे पॅटर्न राबविण्यात येणार आहे. अकोल्यामध्ये फक्त दहा हजार दिव्यांगांची नोंद होती, परंतु आशासेविकांच्या सहकार्याने घरोघरी सर्वेक्षण केले गेले तेव्हा दिव्यांगांची संख्या 45 हजार असल्याचे दिसून आले होते, असे कडू यांनी सांगितले.

वसतिगृहांतील तळमजला दिव्यांगांसाठी

वसतिगृहांमध्ये यापूर्वी दिव्यांगांना प्रवेश मिळत नव्हता, पण आता वसतिगृहातील तळमजला हा दिव्यांगांसाठी राखीव ठेवला जाणार आहे. अनुसूचित जाती आणि जमातींच्या धर्तीवर दिव्यांगांसाठी स्वाधार योजनाही राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संत गाडगेबाबा यांच्या नावाने दिव्यांग घरकुल योजना ग्रामीण भागात राबवली जाईल, असे कडू यांनी सांगितले.