
देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी लाल किल्ल्याजवळ एक भयंकर स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत चार ते पाच गाड्या जळून खाक झाल्या. या घटनेमुळे नऊ जणांचा मृत्यू झाला असून 24 हून अधिक जखमी झाले आहेत. दिल्लीच्या सुभाष रोडवर धावत्या कारमध्ये ही घटना घडली. दरम्यान या कारचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.
सोमवारी सायंकाळी झालेल्य़ा या बॉम्बस्फोटाप्रकरणी आता एक महत्त्वाची बाब समोर येत आहे. ज्या कारमध्ये स्फोट झाला त्याच पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई i20 कारचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजनुसार, ही कार स्फोटापूर्वी तीन तासांहून अधिक काळ सुनहरी मशिदीजवळच्या पार्किंग लॉटमध्ये उभी होती. ही कार (HR 26CE7674) दुपारी 3.19 वाजता पार्किंगमध्ये शिरली आणि सुमारे संध्याकाळी 6.30 वाजता बाहेर पडली. यानंतर कार सिग्नलजवळ येताच सुमारे 6.55 ला स्फोट झाला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
VIDEO | Delhi: CCTV visuals of the suspect and the car involved in the blast near Red Fort Metro Station, Chandni Chowk.
The blast, which occurred yesterday around 7 PM, claimed at least 9 lives and injured several others.#DelhiBlast #ChandniChowk #SecurityUpdate
(Source -… pic.twitter.com/NatPc37vSa
— Press Trust of India (@PTI_News) November 11, 2025
व्हायरल झालेल्या पहिल्या फोटोत या कारच्या चालकाने निळ्या आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला असून खिडकीवर हात ठेवून कार पार्किंगमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. दरम्यान या कारचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने आता तपास यंत्रणार अलर्ट मोडवर असून या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी कारचा नोंदणीकृत मालक असलेल्या मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीला हरयाणातील गुरुग्राम येथून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान ज्या दिवशी दिल्लीत स्फोट झाला त्याच दिवशी सकाळी हरयाणा पोलिसांनी जम्मू-कश्मीर पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई करत आज ‘व्हाइट कॉलर टेरर मॉड्युल’चा पर्दाफाश केला होता. त्यामुळे या घटनेचे दहशतवादी कनेक्शन तर नाही ना, अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.
मुंबईसह अनेक ठिकाणी हाय अलर्ट जारी
दिल्लीतील घटनेनंतर महाराष्ट्र पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. मुंबई, कोलकाता, बंगळुरू, जयपूर, हरयाणा, पंजाब, हैदराबाद, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सध्या बिहारमध्ये निवडणुकांचे वातावरण असल्यामुळे तेथे देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्ली हादरली! मुंबईतही हाय अलर्ट, लाल किल्ल्याजवळ भयंकर स्फोट; 9 ठार, 24 हून अधिक जखमी





























































