पीर बाबर शेख यांच्या दर्ग्यात उरूस साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व भक्तांच्या नवसाला पावणारे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या पीर बाबर शेख यांच्या दर्ग्यात आज उरूस साजरा करण्यात आला. उरुसानिमित्त शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी दर्ग्यावर चादर चढवून दर्शन घेतले.

यावेळी यांच्यासमवेत प्रभारी नगराध्यक्ष तथा तालुकाप्रमुख प्रदिप साळवी, महिला तालुका संघटक सौ. कांचन नागवेकर, शाखाप्रमुख मौलवी नदाब, ऋषिकेश गुजर, धनंजय नलावडे, तुषार नागवेकर तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.