अपहरणासाठी वापरलेले गावठी पिस्तूल, चाकू हस्तगत

721

पिस्तूल, चाकूचा धाक दाखवून अतुल सतीश हजारे याचे अपहरण करणाऱ्या आणि पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या जसपाल सिंग हरीसिंग आणि जोगिंदरसिंग उर्फ जॉनीसिंग उत्तमसिंग पटवा यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी दोघांनी केंब्रीजजवळच्या नाल्यात फेकून दिलेले पिस्टल व चाकू हस्तगत केला आहे.

अतुल याच्या वडिलांना दिलेले व्याजाचे पैसे वसुल करण्यासाठी चौघांनी अतुल याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलिसांनी त्यांच्या कारचा पाठलाग केला असता पोलिसांना पाहून अतुल यास व कार तिथेच सोडून चौघांनी पळ काढला होता. त्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पोलीस कोठडी दरम्यान आरोपींनी कबुली दिली की गुन्ह्यात वापरलेले हत्त्यार हे पळून जाताना केंब्रीज शाळेजवळील नाल्यात फेकले आहे तेव्हा त्यांना घटनास्थळी नेऊन पोलिसांनी ही हत्यारे जप्त केली आहेत. अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. अन्य दोघांत गणेश मरिया लालसरे वय 33 वर्षे रा. साठेनगर, परतुर ता.परतुर जि. जालना 2) अनिल कमलाकर पांजगे वय 29 वर्षे रा. साठेनगर, परतुर ता.परतुर जि. जालना यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या