केदारनाथपर्यंत सात किमीचा बोगदा बांधण्याची योजना

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालय केदारनाथला जाण्यासाठी सात किमी लांबीचा बोगदा बांधण्याची तयारी करत आहे. नियोजनाप्रमाणे जर हा बोगदा येत्या चार-पाच वर्षांत बांधला गेला, तर केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचण्याचे अंतर 11 किमीने खूप कमी होईल.  सध्या गौरीकुंड ते रामबाडा-लिंचोलीमार्गे केदारनाथ धामपर्यंतचा चालण्याचा मार्ग 16 किमी लांब आहे.