गारगोटी ग्रामपंचायत सदस्यांनी झाडे दत्तक घ्यावी : अमरदीप वाकडे

152

सामना प्रतिनिधी । गारगोटी प्रतिनिधी

गारगोटी ग्रामपंचायत सदस्यांनी झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम नुसता हाती घेऊन उपयोग नसून एका सदस्यांने पाच वर्षात पाच झाडे दत्तक घेऊन पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यास मदत करावी, असे आवाहन भुदरगड तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले. ते गारगोटी ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस मैदानावर घेण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात बोलत होते. प्रमुख उपस्थिती सरपंच संदेश भोपळे, तालुका संघाचे अध्यक्ष बाळ देसाई, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल देसाई, जिल्हा परिषदेच्या सदस्या रेश्मा देसाई होत्या.

माजी जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल देसाई म्हणाले, गारगोटी नगरीचा विस्तार होत आहे. वाढत्या नगरीचा विस्तार होत असताना घर तेथे एक फुल झाड किंवा झाड असा उपक्रम गारगोटी ग्रामपंचायतीने हाती घ्यावा.

तालुका संघाचे अध्यक्ष बाळ देसाई म्हणाले पर्यवरणाची हाणी होण्यात मानवच जबाबादर आहे , त्याच प्रमाणे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मानवाने प्रयत्न करण्यासाठी मानवाने एक तरी झाड लावून त्याचे जतन करणे गरजेचे आहे.

जिल्हा परिषदेच्या सदस्या रेश्मा देसाई, पंचायत समितीच्या सदस्या गायत्री भोपळे, वनक्षेत्रपाल अशोक पाटील, पी एस आय कांबळे,माजी संचालक आर.एस.कारखानीस, ग्रामसचिव जालेंद्र बुवा, माजी सरपंच शामराव इंदुलकर, सरपंच अभिजित देसाई, शिवराज देसाई,बजरंग कुरळे, सचिन देसाई, विजय कोटकर, नामदेव पाटील, प्रशांत गुरव, सुरेश देसाई, भालचंद्र भाट, सतीश सावंत, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वास्कर, जयवंत गोरे, राहुल कांबळे, स्नेहल कोटकर, मेघा देसाई , अस्मिता कांबळे,आशाताई भाट, सुकेशनी सावंत,सविता गुरव, अजित देसाई, मचिंद्र मुगडे, दिलीप वीर, बजरंग शिंदे, आदी उपस्थितांचे सूत्रसंचालन तातासाहेब पाटील यांनी केले. स्वागत सरपंच संदेश भोपळे यांनी केले तर आभार उपसरपंच सचिन देसाई यांनी मानले.

 

आपली प्रतिक्रिया द्या