
‘आरोग्य हीच संपत्ती’ आहे हे मावळत्या वर्षाने शिकविले आहे. 2020 हे आव्हानांचे वर्ष होते. 2020चा मंत्र ‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं’ हा होता. आता 2021चा मंत्र -आपल्याकडे ‘औषध आहे आणि सावधगिरीसुद्धा’ हा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
गुजरातच्या राजकोट येथे ‘एम्स’चे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमात औषध आणि सावधगिरी बाळगण्याचा मंत्र पंतप्रधानांनी दिला. लसीकरणाची तयारी सध्या शेवटच्या टप्प्यात असून, लोकांना देशात तयार झालेल्या लसीचे डोस मिळतील. जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येईल. देशात कोरोनाबाधितांची संख्या सध्या कमी होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.


























































