साताऱ्यात मोदींच्या सभेला भिडे गुरुजींची हजेरी, उदयनराजे म्हणतात…

3314

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अखेरची लगबग सुरू झाली आहे. ठिकठिकाणी सत्ताधारी, विरोधकांकडून प्रचार सभांचे जंगी आयोजन करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यात ठाण मांडून आहेत. गुरुवारी नरेंद्र मोदी यांनी साताऱ्यात प्रचार सभा घेतली. या सभेला शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजीही हजर होते.

पंतप्रधान मोदी साताऱ्यात, उदयनराजे-शिवेंद्रराजेंकडून तलवार, पगडी देऊन स्वागत

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे संबंध सर्वांनाच माहिती आहे. पत्रकारांनी भिडे गुरुजी यांनी सभेला हजेरी लावल्याबद्दल उदयनराजे यांनी प्रश्न विचारला. यावेळी ‘वंदनीय भिडे गुरुजी सभेला आल्यामुळे शोभेत भर पडली’, असे विधान उदयनराजे भोसले यांनी केले.

दरम्यान, सातारामध्ये होत असणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले आणि विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याच अनुषंगाने प्रचारासठी पंतप्रधान मोदी साताऱ्यामध्ये पोहोचले. या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी मोदींना पगडी घातली आणि तलवार देऊन त्यांचे स्वागत केले. मोदींनीही म्यानातून तलवार काढत उंचावत उपस्थितांना अभिवादन केले.

Live – पंतप्रधान नरेंद्र मोदींची साताऱ्यात सभा

आपली प्रतिक्रिया द्या