
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जपानचा दौरा द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने आहे, तर चीनमध्ये ते शांघाय सहकार्य संघटनाच्या (SCO) शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. 2020० मध्ये गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर पंतप्रधान मोदी यांची ही चीनला पहिली भेट असेल.
या भेटीदरम्यान, हिंदुस्थान-चीन संबंधांमधील तणाव कमी करण्यासाठी आणि सीमा विवादासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. SCO परिषदेत सहभागी होताना पंतप्रधान मोदी यांचा मुख्य भर क्षेत्रीय सहकार्य आणि स्थैर्यावर असेल.