तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा असून ते इटलीला जाणार आहेत. इटलीमध्ये जी 7 शिखर परिषदेचे 13 ते 15 जून 2024 या कालावधीत आयोजन करण्यात आलेले असून या शिखर परिषदेमध्ये ते सहभागी होणार आहेत. परिषदेमध्ये जागतिक पातळीवरील काही महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.जाणून घेऊया शिखर परिषदेत कोणत्या महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे त्याबाबत.
इटलीत होणाऱ्या जी 7 शिखर परिषदेत अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी, कॅनडा, जपान, ब्रिटन या देशाच्या प्रमुख नेत्यांचा सहभाग असणार आहे. आऊटरीच देश म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
इटलीच्या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह अनेक देशाच्या प्रमुखांबरोबर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.14 जून रोजी मोदी आऊटरीच सत्रात सहभागी होणार आहेत. जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एनर्जी, आफ्रिका आणि भूमध्यसागरावर लक्ष केंद्रित करतील. या भेटीमुळे मोदींना हिंदुस्थान आणि ग्लोबल साउथच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर शिखर परिषदेत उपस्थित असलेल्या अन्य जागतिक नेत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. हिंदुस्थान स्वित्झर्लंडमधील युक्रेन पीस समिटमध्ये सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील इटलीतील G7 शिखर परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. जे जागतिक आणि हिंदुस्थानच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. तसेच मध्य पूर्व आणि युक्रेन या क्षेत्रांमध्ये चालू असलेल्या संघर्षांमुळे शिखर परिषदेत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.