पंतप्रधान मोदींनी केली राज्य सरकारांची प्रशंसा, आर्थिक संकटावर केली चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. कोरोना संकटात राज्य सरकारांनी चांगली कामगिरी बजावली या शब्दांत पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारांची प्रशंसा केली. तसेच देशाला आर्थिक संकटातून काय उपाययोजना करता येतील यावरही पंतप्रधान मोदींनी चर्चा केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनाशी लढण्यात आपल्याला जे यश मिळाले आहे त्याला जागतिक मान्यता मिळाली आहे. सर्व राज्य सरकारने उत्तम कामगिरी बजावली. ग्रामीण भागात हे संकत पोहोचता कामा नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे असे मोदी म्हणाले. देशात हळू हळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पुढील काळात हे संकट संपून संपूर्ण कामकाज सुरू होईल. कोरोनाशी लढण्यासाठी आपल्याला अजून ताकद लावली पाहिजे असेही मोदी म्हणाले.

या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये पाच मुख्यमंत्री सामील झाले होते. इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान टप्प्याटप्याने चर्चा करतील. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृह मंत्री अमित शहा आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धनही उपस्थित होते.