चार महिन्यांत पंतप्रधान मोदींचे 7 परदेश दौरे

421

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांत 7 परदेशदौरे केले असून यात त्यांनी 9 देशांना भेटी दिल्या अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी बुधवारी संसदेत दिली. या कालावधीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सात देशांमध्ये तीन परदेशदौरे केले असून उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनीही सहा देशांमध्ये तीन परदेशदौरे केले, असेही मुरलीधरन यांनी पुढे स्पष्ट केले. लोकसभेत एका लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरात मुरलीधरन यांनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि आपल्या परदेशदौऱयांची माहिती उघड केली. पंतप्रधान मोदी यांनी ऑगस्टपासून नोव्हेंबरपर्यंत केलेल्या 7 परदेशदौऱयांमध्ये त्यांनी भूतान, फ्रान्स, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, रशिया, बाहरीन, अमेरिका, थायलंड आणि ब्राझिल या 9 राष्ट्रांना भेटी दिल्या, असेही मुरलीधरन म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या