सीएए कायदा मागे घ्या; ममता बॅनर्जी यांची पंतप्रधानांकडे आग्रही मागणी

666

एनआरसी आणि सीएएला बंगालमध्ये प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे याबाबत सरकारला पुनर्विचार करावाच लागेल, असे सांगतानाच सीएए कायदा तातडीने मागे घ्या, अशी आग्रही मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. मोदी दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱयावर आहेत. यादरम्यान कोलकात्यात ममता बॅनर्जी आणि मोदी यांची भेट झाली. दरम्यान मी अन्य एका कार्यक्रमासाठी कोलकात्यात आलो आहे. त्यामुळे तुम्ही दिल्लीत येऊन भेटा असे मोदी यांनी आपल्याला सांगितल्याचे ममता यांनी पत्रकारांना सांगितले. मोदी यांची घेतलेली भेट हा राजशिष्टाचाराचा एक भाग होता. पंतप्रधान आणि राष्ट्रपती कोलकात्याच्या दौऱयावर आहेत त्यामुळे त्यांचे स्वागत करणे हे माझे कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया ममता यांनी पत्रकारांना दिली. मोदी यांची भेट घेतल्यानंतर ममता यांनी लगेचच सीएएविरोधात तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात सहभाग घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या