टॅक्स भरणाऱयांसाठी मोदी आज काय देणार? प्रामाणिक करदात्यांसाठी नवे व्यासपीठ

वेळेत प्रामाणिक कर भरणाऱयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि. 13) महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यासाठी ‘पारदर्शी करआकारणी ः प्रामाणिकतेचा सन्मान’ असे नवे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान टॅक्स भरणाऱयांसाठी काय देणार? कोरोना काळात होणाऱया या करबदलांकडे देशाचे लक्ष लागले आहे.

आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱया या कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यमंत्री अनुराग ठाकूर उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) गेल्या काही वर्षात प्रत्यक्ष करांमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. कॉर्पोरेट टॅक्स 30 टक्क्यांवरून 22 टक्के केला आहे. करविवाद सोडविणाऱयांसाठी प्राप्तीकर विभागाने प्रयत्न केले आहेत. करांचे दर कमी करणे आणि प्रत्यक्ष दर कायद्दय़ांमध्ये सुलभीकरण करण्याकडेही लक्ष दिले आहे. दरम्यान, कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांच्याकडून करदात्यांना काय गुड न्यूज मिळते याकडे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या