
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 सप्टेंबर रोजी पूर्वोत्तर दौऱयावर जाणार आहेत. यावेळी ते मणिपूरला जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मोदी येणार असल्याने मणिपुरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
ज्ञान भारतम पोर्टलचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ज्ञान भारतम पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. हे पोर्टल पांडुलिपीचे डिजिटिलीकरण आणि संरक्षण करण्यासाठी आणलेले डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
मॉरीशसचे पंतप्रधान अयोध्येत
मॉरीशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम हे सध्या हिंदुस्थान दौऱयावर आहेत. शुक्रवारी त्यांनी अयोध्येतील
श्री राम जन्मभूमी मंदिरात जाऊन पूजाअर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.
छत्तीसगडमध्ये दोन नक्षलवादी ठार
छत्तीसगडच्या बीजापूर जिह्यात शुक्रवारी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. अवघ्या 24 तासात छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाची ही मोठी कामगिरी आहे. गुरुवारी गरियाबंद जिह्यात 10 नक्षलवादी ठार करण्यात यश मिळाले होते.
सिक्कीममध्ये भूस्खलन, 4 जणांचा मृत्यू
सिक्कीमच्या यांगथांगमध्ये झालेल्या भूस्खलनात 4 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण बेपत्ता झाले आहेत. दोन जणांना ढिगायातून काढण्यात यश आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.