मोदींचा नवा नारा ‘अस्वच्छता भारत छोडो’

543

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘अस्वच्छता भारत छोडो’चा नवीन नारा दिला. राजघाटावर राष्ट्रीय स्कच्छता केंद्राचे लोकार्पण करुन त्यांनी या देशव्यापी अभियानाची सुरुवात केली. देशातील जनतेने 15 ऑगस्टपर्यंत स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे, तसेच गंगेप्रमाणेच इतर नद्याही स्कच्छ, निर्मळ बनवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही केले. त्यांनी राष्ट्रीय स्कच्छता केंद्र राष्ट्रपिता महात्मा गांधींना समर्पित केले.

महात्मा गांधीजींच्या चंपारण सत्याग्रहाला 100 कर्षे पूर्ण झाली, त्याकेळी 10 एप्रिल 2017 रोजी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्कच्छता केंद्राची पहिल्यांदा घोषणा केली होती. त्या घोषणेला अखेर शनिवारी मूर्त रूप प्राप्त झाले. यावेळी मोदींनी गांधीजींच्या कार्याची थोरवी गायली. गांधीजी स्वच्छतेमध्ये स्वराज्याचे प्रतिबिंब पाहायचे, स्कच्छता हाच स्वराज्याचा एक मार्ग असल्याचे ते मानायचे. राष्ट्रीय स्वच्छता केंद्र हे गांधीजींच्या स्वच्छाग्रहाप्रती 130 कोटी हिंदुस्थानींची श्रद्धांजली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. त्यांनी गावांमध्ये सार्वजनिक शौचालये उभारण्यासाठी अभियान राबवण्याच्या सूचनाही जिल्हा पातळीवरील अधिकाऱयांना केल्या.

ऐतिहासिक दिवस
– देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात 8 ऑगस्ट या दिवसाचे खूप मोठे योगदान आहे. याच दिवशी 1942 मध्ये महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली विराट जनआंदोलन सुरू झाले होते. इंग्रजांना ’भारत छोडो’चा नारा देण्यात आला होता. त्याच अनुषंगाने आम्ही ‘अस्वच्छता भारत छोडो’ अभियान राबवत आहोत. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

राहुल यांचा मोदींना सवाल
पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या आवाहनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदींचे वाक्य असलेले ट्विट करीत सत्य सांगण्याचे आव्हान दिले. ‘का नाही! आपल्याला एक पाऊल पुढे जाऊन देशात वाढत चाललेल्या असत्याची घाणही साफ करायची आहे. पंतप्रधान चीनने आक्रमणाविषयीचे सत्य देशाला सांगून या सत्याग्रहाची सुरुवात करणार का?’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या