‘तुझं वय खरंच इतकं आहे की…’‘फिट इंडिया संवाद’मध्ये नरेंद्र मोदींकडून मिलिंद सोमणच्या फिटनेसचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिटनेसबाबत देशातील खेळाडू आणि सेलिब्रिटींशी ‘फिट इंडिया संवाद’मधून चर्चा केली. अभिनेता मिलिंद सोमण, हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, पॅरा ऑलिम्पियन देवेंद्र झाझरिया आणि आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्याशी संवाद साधून मोदी यांनी त्यांच्या फिटनेममागचे रहस्य जाणून घेतले.

मिलिंद सोमण याच्या फिटनेसचे कौतुक करताना नरेंद्र मोदी यांनी, ‘तुझं वय खरंच इतकं आहे की दुसरे काही रहस्य आहे?’ असा प्रश्न विचारला. त्यावर मिलिंदने उत्तर दिले की, ‘अनेकजण मला माझ वय खरंच 55 आहे का असे विचारतात. या वयातही मी 500 किलोमीटर कसे धावू शकतो याचे त्यांना आश्चर्य वाटते. मी त्यांना सांगतो की, माझ्या आईचे वय 81 वर्षे आहे आणि मी 81 वर्षांचा होईन तेव्हा मलाही तिच्यासारखेच व्हायचे आहे. माझी आई माझ्यासाठी आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे.’

कर्णधार फिटनेस टेस्ट करतो का?
विराट कोहलीबरोबर चर्चा करताना नरेंद्र मोदी यांनी त्यालाही काही प्रश्न विचारले. ‘सध्या संघामधील प्रत्येकाची यो यो टेस्ट घेतली जाते. कर्णधारालाही ती करावी लागते की त्यातून त्याला सूट मिळते. मूळात ही टेस्ट काय असते आणि त्यात काय-काय करावे लागते?’ असे मोदींनी विचारले. त्यावर कोहली याने उत्तर दिले की, ‘खेळांडूंचा फिटनेस तपासण्यासाठी ही टेस्ट केली जाते, असे त्याने यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या