ट्रम्प टॅरिफ आणि युद्धावर मोदी-पुतीन चर्चा नाही; नाटो प्रमुख खोटं बोलले, हिंदुस्थानचे प्रत्युत्तर

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफनंतर हिंदुस्थानने रशियाला युक्रेन युद्धाबद्दल आपली रणनीती स्पष्ट करण्यास सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात याबाबत थेट चर्चा झाल्याचा दावा, नाटो प्रमुख मार्क रूट यांनी केला होता. मात्र, हा दावा हिंदुस्थानने फेटाळला आहे.

नाटोप्रमुखांचे हे विधान चुकीचे आणि निराधार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. नाटोसारख्या महत्त्वाच्या संघटनेच्या नेतृत्वाने जबाबदारीने बोलले पाहिजे. त्यांच्या बोलण्याला सत्याचा आधार असला पाहिजे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी सांगितले. पतंप्रधानांबाबत गैरसमज निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.