आखातातील युद्धाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम, पण शक्य तिथून गॅस आणि कच्चे तेल मिळवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न! पंतप्रधान मोदींची संसेदत माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत आखाती देशातील परिस्थितीबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आखाती युद्धामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांपैकी हिंदुस्थान एक आहे. आमचे सर्व दूतावास अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यात गुंतली आहेत. हिंदुस्थानींच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य असल्याचे मोदी यांनी सांगितले.

अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणारी जहाजे भारतात सुरक्षितपणे पोहोचावीत, हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्व संबंधित घटकांशी संवाद साधत आहोत. हिंदुस्थानने गेल्या ११ वर्षांत आपल्या कच्च्या तेलाच्या आयातीत विविधता आणली आहे. पूर्वी ऊर्जेची आयात २७ देशांकडून होत असे, पण आता ती ४१ देशांकडून होते. आपली शुद्धीकरण क्षमताही वाढली आहे. आपल्याकडे ५३ लाख मेट्रिक टन कच्च्या तेलाचा साठा आहे. आपले लक्ष्य ६५ लाख मेट्रिक टन आहे. अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणारी जहाजे भारतात सुरक्षितपणे पोहोचावीत, हे सुनिश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही सर्व संबंधित घटकांशी संवाद साधत आहोत. या प्रयत्नांमुळे, होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेली आपली अनेक जहाजे परतली आहेत. गेल्या १०-११ वर्षांत इथेनॉल उत्पादन आणि मिश्रणावर बरेच काम झाले आहे. पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळले जात आहे, ज्यामुळे बचतही होत आहे, असे ते म्हणाले.

आम्ही मेट्रो नेटवर्कचा विस्तार केला आहे आणि इलेक्ट्रिक वाहतुकीवर मोठा भर दिला आहे. आज पर्यायी इंधनांवर जे काम केले जात आहे, त्यामुळे भारताचे भविष्य अधिक सुरक्षित होईल. ऊर्जा हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पश्चिम आशिया हा जागतिक ऊर्जेच्या गरजांचा एक प्रमुख स्रोत आहे. सध्याच्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्याचे अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन परिणाम हाताळण्यासाठी सरकार धोरणात्मकदृष्ट्या काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले. आमची शुद्धीकरण क्षमताही वाढली आहे. आम्ही अनेक देशांच्या सतत संपर्कात आहोत आणि गॅस व तेलाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.

हिंदुस्थानकडे पुरेसे अन्नधान्य आहे. खरीप हंगामाची पेरणी योग्य प्रकारे केली जाऊ शकते. सरकारने पुरेशा अन्नधान्याची व्यवस्था केली आहे. आम्ही यापूर्वी शेतकऱ्यांना संकटाच्या ओझ्यापासून वाचवले आहे. जागतिक बाजारात युरियाच्या एका पोत्याची किंमत ३,००० रुपयांपर्यंत पोहोचली, परंतु तेच पोते भारतीय शेतकऱ्यांना ३०० रुपयांपेक्षा कमी किमतीत सरकारने दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

हे संकट आता तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून सुरू आहे. संपूर्ण जग सर्व पक्षांना हे संकट लवकरात लवकर सोडवण्याचे आवाहन करत आहे. या युद्धामुळे देशासमोर अभूतपूर्व आव्हानेही उभी राहिली आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या संकटाचा संदेश भारतीय संसदेतूनही जगाला पोहोचवला पाहिजे. त्यांनी सभागृहाला संघर्षादरम्यान मायदेशी परतलेल्या भारतीयांबद्दल माहिती दिली आणि सांगितले की, भारतीयांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आमची दूतावासे बाधित देशांमधील भारतीयांना सातत्याने मदत करत आहेत.

सध्याच्या संकटाच्या जगावर परिणाम होत आहे. हिंदुस्थानवर कमीतकमी परिणाम होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. दूरदृष्टीने योग योजना आखत काम सुरू आहे. गॅसचा पुरवठा शक्य तिथून करणार. साठ्यामुळेही मोठे संकट टळले आहे. इथेनॉलच्या वापरामळे इंधनाच्या आयातीत घट झाली आहे. सौर उर्जेच्या माध्यमातून इंधनाची मागणी घटली आहे. खतांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांना संकटापासून वाचवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. अनेक युरिया प्लांट सुरू करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या काळात इंधन आणि वीजेची मागणी वाढणार आहे. त्यासाठी अपारंपारिक उर्जा निर्मितीकडेही आम्ही लक्ष ठेवले आहे, असे ते म्हणाले.

या युद्धाबाबत देशाची भूमिका स्पष्ट आहे. आपण पश्चिम आशियातील देशांशी चर्चा करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच हार्मुझमधील वाहतूक सुरू राहण्यासाठी आमचे पयत्न सुरू आहे. हिंदुस्थान नेहमी शांततेच्या आणि मानवतवादी भूमिका आहे. या युद्धाचे दीर्घकाळ परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्यासाठी आपल्याला तयार राहवे लागणार आहे. आपल्याला सावधान, सतर्क राहवे लागणार आहे. राज्य सरकारने काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.