
कांजूरमार्गच्या कर्वेनगरात एमएमआरडीएकडून स्वस्तात घर मिळवून देतो असे सांगत सहा जणांनी एकाला 20 लाख 40 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला होता. त्यातील एक महिला आरोपी पोलिसांना चकवा देत अखेर कांजूरमार्ग पोलिसांनी तिला सावंतवाडी येथील गावातून उचलले. स्नेहल हरमळकर असे पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. सचिन हरमळकर, स्नेहल हरमळकर, गणेश विचारे, प्रवीण गुरव, राकेश सूर्यवंशी आणि मिश्रा अशा सहा जणांनी एकाचा विश्वास संपादन केला व कांजूरमार्गच्या कर्वेनगरात स्वस्तात घर मिळवून देतो असे सांगत त्याच्याकडून 20 लाख 40 हजार रुपये घेतले आणि फसवणूक केली. याप्रकरणी एप्रिल 2018 रोजी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ निरीक्षक संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साटम व पथकाने कसून शोध घेत स्नेहलला सावंतवाडी येथून ताब्यात घेतले.


























































