पोलिसांकडून 15 बांगलादेशी घुसखोरांचे मतदान कार्ड रद्द

पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने जून 2024मध्ये भोसरी येथे जेरबंद केलेल्या बांगलादेशी घुसखोरांपैकी एकाने मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांना आतापर्यंत 15 बांगलादेशी घुसखोरांकडे मतदान कार्ड आढळून आली असून ती सर्व कार्ड रद्द करण्यात आली आहेत अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विकास राऊत यांनी दिली. भोसरीतील शांतीनगर येथे 25 मे 2024 रोजी दहशतवादविरोधी पथकाने छापा टापून पाच घुसखोरांना जेरबंद केले होते. त्यापैकी एकाने 2019मध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही मतदान केले होते. त्याच्यासह आणखी एकाने पासपोर्टचा वापर करून विमानाने बांगलादेशची वारी केल्याचेही निष्पन्न झाले होते.