धर्मेंद्र यांचा आयसीयूतील व्हिडीओ लीक करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा ‘आयसीयू’मधील व्हिडीओ लीक करणाऱ्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात धर्मेंद्र दाखल असतानाचा हा व्हिडीओ लीक झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला होता.  सोशल मीडियावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील एक क्लिप व्हायरल झाली, ज्यामध्ये रुग्णालयात दाखल असलेल्या धर्मेंद्र यांच्या भोवताली त्यांचे संपूर्ण कुटुंब असल्याचे दिसत होते. हा व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त करीत पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी व्हिडीओ शूट करून लीक करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे.