शर्जिल इमाम समर्थनार्थ घोषणा प्रकरण -उर्वशी चुडावालाची पोलिसांकडून चौकशी

517

सोशल ऍक्टिव्हिस्ट शर्जिल इमाम याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणारी उर्वशी चुडावाला हिने आज सलग दुसर्‍या दिवशी आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजेरी लावली. यावेळी पोलिसांनी तिची चौकशी करून जबाब नोंदवला आणि सोडून दिले. उर्वशी आता येत्या मंगळवारी पोलीस ठाण्यात हजर राहणार असल्याचे समजते.

शर्जिलच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याप्रकरणी उर्वशी चुडावाला हिच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून उर्वशी बेपत्ता झाली होती. पोलीस तिचा कसून शोध घेत होते. दरम्यान, हायकोर्टाने तिला अंतरिम जामीन मंजूर करीत 12 व 13 फेब्रुवारीला आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश दिले. त्यानुसार उर्वशी बुधवारी पोलीस ठाण्यात हजर झाली. पोलिसांनी तिची विचारपूस केल्यानंतर तिला जाऊ दिले होते. गुरूवारी पुन्हा तिची चौकशी करून जबाब नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या