पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या

630

श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील लक्ष्मीवाडी परीसरातील पोलीस शिपाई बापूसाहेब कारभारी रणनवरे (वय 50) यांनी राहत्या घराच्या छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

बापू रणनवरे यांनी आत्महत्या केली त्यावेळी घरी कोणीही नव्हते. त्यांची पत्नी व मुले बाहेरगावी गेलेले होते. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार काही वेळाने त्यांच्या पुतण्याच्या लक्षात आल्याने त्याने आरडाओरडा केला. शेजारी असलेले लखन शामराव खरात यांना माहिती दिली. येथील साखर कामगार रुग्णालयात त्यांचा मृतदेह आणला असून तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केल. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, वडील, आई असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या