अनिल सोनवणे यांचे निधन

23

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल श्यामराव सोनवणे यांचे मंगळवारी (11 डिसेंबर) दुपारी मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे.

सोनवणे सध्या मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलमध्ये कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या पोलीस कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या गुह्यांच्या तपासात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. सोनवणे यांनी शहरातील विविध पोलीस ठाण्यांसह क्राइम ब्रँचमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांच्या कामाची दखल घेत पोलीस महासंचालक पदकाने त्यांना गौरविण्यात आले होते. मंगळवारी रात्री उशिरा घाटकोपर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी तसेच इतर क्षेत्रांतील अनेकजण उपस्थित होते. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी सोनवणे यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या