
आरटीओ चलनची एपिके फाईल पाठवून ठगाने पोलीस उपनिरीक्षकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 5 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार हे मुंबईतील एका पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून काम करतात. दोन दिवसांपूर्वी ते बोरिवली येथे खरेदी करत होते. तेव्हा त्यांना मोबाईलवर एक मेसेज दिसला. खात्यातून 5 लाख रुपये काढल्याचा तो मेसेज होता. त्याना व्हॉट्सअपवर आरटीओ ई-चलन एपिके फाईल आली होती. त्या फाईलवर त्याने क्लिक केले होते. क्लिक केल्यावर ती फाईल रन झाली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने मोबाईलची तपासणी केली. त्याचा मोबाईल नंबरदेखील फॉरवर्ड मोडवर होता. खात्यातून 5 लाख रुपये गेल्या प्रकरणी त्याने बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद केला आहे.



























































