पोलिसांना गुंगारा देण्यासाठी देवघरात लपवले अमली पदार्थ

देवघरात अमली पदार्थ लपवून ठेवल्याची घटना केरळमध्ये घडली. पोलिसांनी देवघरातून 1.2 किलो गांजा आणि पाच ग्रॅम एमडीएमए साठा जप्त करण्यात आला. थलासरी येथील रेनील नावाच्या इसमाच्या घरून हा माल पकडण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच रेनील पळून गेला. तीन दिवसांपूर्वी पोलिसांना ड्रग्जची टिप मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. मात्र त्यांच्या हाताला काही लागले नाही. त्यानंतर शनिवारी पुन्हा पोलिसांनी त्याच्या घरावर धाड टाकली.