४५ जनावरांसह वाहन जप्त १५ लाखाचा मूद्देमाल जप्त ; आरोपी पसार

81

प्रसाद नायगांवकर । यवतमाळ

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत जनावरांना निर्दयीपणे वाहनात कोंबून त्यांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांचा मनसुबा पोलिसांनी हाणून पाडला आहे.  पोलिसांनी आज सकाळी एक दहाचाकी वाहनाला ताब्यात घेतले असून त्यातल जवळपास ४५ जनावरांची तस्करांपासून सुटका केली आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, गस्तीवर असतांना शहरातील ढाणकी रोडवर एका दहाचाकी ट्रकमध्ये कत्तलीच्या उद्देशाने जणावरे नेत असल्याचे पोलिसांना आढळून आले. या ट्रकचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना विडूळ गावाजवळ थांबविले. एक चालक आणि त्याचा साथीदार हे ट्रक सोडून पसार होण्यात यशस्वी झाले. त्यानंतर ट्रकला ताब्यात घेतले असता पोलिसांना ट्रकमध्ये जनावरे कोंबलेल्या अवस्थेत आढळून आली. या सर्व जनावरांचे पाय दोरीने बांधलेले होते. ट्रक मध्ये २२ पांढऱ्या रंगाचे गोरे ज्याची किंमत १ लाख ६५ हजार रुपये , १६ लाल / तांबडया रंगाचे गोरे ज्याची किंमत १ लाख २० हजार रुपये , ७ काळ्या रंगाचे गोरे ज्याची किंमत ५२ हजार ५०० रुपये किंमत आहे. सदर जनावरांची किंमत ३ लाख ३७ हजार ५०० रुपये एवढी असून एक दहाचाकी ट्रक किंमत १२ लाख असा एकूण १५ लाख ३७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे . सर्व जनावरे श्री गोपालकृष्ण गोरक्षण चॅरीटेबल ट्रस्ट असोली ( गोळ ) ता. पूसद येथे संगोपणाकरिता सोपविण्यात आली .

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पशुसंवर्धन अधीनीयम १९९४ व सहकलम ११ ( ड. ई. ) आणि प्राण्यांना निर्दयी वागविणे अधिनियम व सहकलम ६६ , १९२, १३० नूसार गून्हे नोंद करुन आरोपिचा शोध सूरू असल्याची माहीती पोलीस निरिक्षक हनुमंत गायकवाड यांनी दिली आहे .

आपली प्रतिक्रिया द्या