Pooja Khedkar News : पूजा खेडकर यांची युपीएससी विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव, निवड झाली होती रद्द

पूजा खेडकर यांची निवड युपीएससीने रद्द केली होती. आता या निर्णयाविरोधात पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दिव्यांग कोट्यातून पूजा खेडकर या UPSC परीक्षा पास झाल्या होत्या. पण त्यानंतर खेडकरांचे अनेक कारनामे बाहेर आले होते. वडिलांची संपत्ती कोट्यवधी रुपयांच्या घरात असतानाही ओबीसी कोट्यातून पूजा खेडकर यांनी अर्ज भरला होता. परीक्षा देण्याची संधी संपली असतानाही पूजा खेडकरांनी नाव बदलून परीक्षा दिली होती. असे एक ना अनेक कारनामे समोर आल्यानंतर युपीएससीने पूजा खेडकर यांना तुमची निवड का रद्द करू नये अशी नोटीस बजावली होती. या नोटीशीला पूजा खेडकरांनी उत्तर दिले नव्हते. आपल्याला उत्तर देण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी खेडकरांनी केली होती. युपीएससीने पूजा खेडकरांना 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिली. होती. 31 ऑगस्टला दुपारच्या सुमारास युपीएससीने पूजा खेडकरांची नियुक्ती रद्द केली होती. आता याच निर्णयाविरोधात पुजा खेडकरने दिल्लीत उच्च न्यायलात धाव घेतली आहे.