
सध्या देशभराच समान नागरी कायदा आणि ‘एक देश, एक निवडणूक’ याबाबत चर्चा होत असते. आता हे दोन महत्त्वाचे मुद्दे सरकारसाठी महत्त्वाचे आहेत. तसेच त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. हे दोन मुद्दे देशासाठी महत्त्वाचे असून याचे फायदेही त्यांनी सांगितले. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी याबाबतची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ‘समान नागरी संहिता’ (UCC) आणि ‘एक देश, एक निवडणूक’ या दोन मुद्द्यांचा भाजपच्या अजेंड्यातील विषय म्हणून उल्लेख केला आणि सांगितले की, या दोन्ही विषयांवर सध्या गंभीर व सकारात्मक चर्चा सुरू आहे. समान नागरी संहिता आणि ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयांवर देशात गंभीर चर्चा सुरू आहेत आणि आम्ही या संदर्भात सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहोत, असे ते म्हणाले.
‘एक देश, एक निवडणूक’ या प्रणालीचा उद्देश विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी आयोजित करणे हा आहे. तर ‘समान नागरी संहिता’ (UCC) द्वारे संपूर्ण देशभरात विवाह, दत्तक विधान इत्यादींबाबत सर्वांसाठी समान कायदे लागू करण्याचा प्रयत्न केला जातो.
ब्रिटिश काळातील शेकडो कालबाह्य कायदे रद्द करणे, लोकशाहीसाठी नवीन संसद भवनाची उभारणी यासह अनेक कामांचा आणि योजनांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी भाजपचे कौतुक केले.

























































