चोरट्यांनी पोस्ट बॉक्सवरच मारला डल्ला

चोर कशाची चोरी करेल सांगता येत नाही. अशीच एक घटना शहरातील यशवंतनगरमध्ये घडली आहे. चोरट्यांनी बसस्थानकाच्या मागे असलेल्या भिंतीवरील लोखंडी पोस्ट बॉक्सचीच चोरी केली आहे. ही घटना गेल्या बुधवारी घडली आहे. याप्रकरणी आकाश पुंड (वय 26, रा. देउळगाव, दौंड) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चतुःशृंगी परिसरातील यशवंतनगरमध्ये पोस्ट खात्याने नागरिकांना पत्र टाकण्यासाठी लोखंडी पेटी भिंतीला अडकवून ठेवली होती. वर्षानुवर्षे पेटी तेथेच होती. मात्र, 18 नोव्हेंबरला चोरट्यांनी पोस्ट खात्याची लोखंडी पेटी चोरून नेली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विक्रम वीर तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या