
सध्याच्या घडीला पांढऱ्या केसांवर अगदी परफेक्ट उपाय म्हणजे केसांना कलर करणे. केसांना कलर करणे हे अगदी सोप्पे झालेले आहे. परंतु हा कलर अनेकदा टिकत नाही. त्यामुळे आपल्याला कळत नाही की, हा कलर नेमका का जातो. केसांना लावलेला कलर किमान टिकण्यासाठी आपण काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
केसांना कलर केल्यानंतर तेल लावताना काही महत्त्वाच्या गोष्टी या लक्षात ठेवायला हव्यात. नाहीतर केसांचा कलर उडण्याचा संभव असतो. केसांना कलर लावल्यानंतर आपल्या सर्वांनाच रंग दीर्घकाळ टिकावा असे वाटते. पण अनेकदा एक प्रश्न सतावतो की, कलर केल्यानंतर केस किती दिवसांनी धुवावेत? खरंतर केसांना रंग दिल्यानंतर केसांच्या गरजा थोड्या वेगळ्या होतात. योग्य काळजी न घेतल्यास केसांना लावलेला कलर जास्त काळ टिकत नाही. केसांना कलर केल्यानंतर, पहिले ३-४ दिवस कोणत्याही प्रकारच्या तेलापासून दूर ठेवा. म्हणजे कलर केसांमध्ये व्यवस्थित लागेल.
Hair Care – केसगळतीकडे दुर्लक्ष करु नका, वाचा यामागील महत्त्वाची कारणे
तेल कधी आणि कसे लावायचे?
केसांना कलर केल्यानंतर सुमारे ४-५ दिवसांनी हलक्या हातांनी तेल लावावे. नारळ किंवा बदाम तेल यासारखे सौम्य तेल वापरावे. तेल फक्त ३०-४५ मिनिटे ठेवावे. तेल जास्त वेळ लावल्याने रंग फिका पडू शकतो.
केस कधी धुवावेत?
केसांना कलर केल्यानंतर किमान ४८ तासांनी केस धुवावेत. यामुळे केसांमध्ये रंग व्यवस्थित बसतो आणि लवकर फिका पडत नाही. पहिल्या धुण्यासाठी नेहमी सल्फेट-मुक्त आणि रंग-संरक्षण करणारा शाम्पू वापरा.