महाडचा वीजपुरवठा खंडीत, चवदार तळय़ाच्या परिसरातील डीपीमध्ये स्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध चवदार तळय़ाच्या परिसरातील गणेश मंदिराच्या डीपीमध्ये आज संध्याकाळी अचानक मोठा स्पह्ट झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे महाड शहरातील काही भागाचा वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला.

डीपीच्या आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेऊन आग आटोक्यात आणली. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱयांनीही जाऊन आग पसरू नये म्हणून वीजपुरवठा खंडीत केला. या आगीत संपूर्ण डीपी जळून खाक झाला आहे.