
पोस्ट कार्यालयात पीपीएफ, सुकन्या समृद्धी आदी अल्पबचत खाती उघडणाऱया नागरिकांसाठी खूशखबर आहे. टपाल खात्याने या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासंबंधित नियमावलीत बदल केले आहेत. या बदलांनुसार यापुढे कोणत्याही शाखेत जाऊन पीपीएफ खात्यामध्ये 25 हजारांहून अधिक रकमेचा धनादेश जमा करता येणार आहे. टपाल खात्यातील बचतीवर चांगले व्याज मिळत असल्यामुळे याचा गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे.
नव्या नियमावलीनुसार टपाल कार्यालयाच्या बचत योजनांचे खातेधारक त्यांचे खाते असलेल्या शाखेव्यतिरिक्त दुसऱया शाखेतही 25 हजारांहून अधिक रकमेचा धनादेश जमा करू शकणार आहेत. आधीच्या नियमावलीनुसार एकावेळी 25 हजारांपर्यंतचीच रक्कम खात्यात जमा करता येत होती. 2 डिसेंबरच्या आदेशानुसार टपाल खात्याने आपल्या नियमावलीमध्ये सुधारणा केली आहे. टपाल खात्यातील गुंतवणूक अधिक सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.
आकर्षक व्याजदर
पीपीएफवरील व्याजदर 7.90 टक्के आहे. तसेच सुकन्या समृद्धी योजनेवर 8.4 टक्के, करिष्ठ नागरिक बचत योजनेवर 8.6 टक्के, राष्ट्रीय बचत पत्र योजनेवर 7.9 टक्के, किसान किकास पत्र योजनेवर 7.6 टक्के इतके व्याज आहे. त्याचबरोबर पाच वर्षांच्या डिपॉझिटवर 7.7 टक्के व्याज मिळते.

























































