VIDEO – प्रभादेवीतील ओंकार इमारतीचे दोन मजले कोसळले

937

प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिराजवळ असलेल्या ओंकार इमारतीचे दोन मजले कोसळल्याची घटना आज सकाळी 11. 30 वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जयप्रभा व ओंकार या दोन इमारती तळमजल्यासह तीन मजली इमारती एकमेकांना लागून आहेत. या दोन्ही इमारती जुन्या आहेत. गेले 2 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या ओंकार इमारतीतील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील भाग कोसळला. यावेळी घरात लोक राहत होती. घटना घडताच रहिवाशांनी इमारती खाली धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही इमारतींचा पुर्नवसनाचा वाद असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. इमारत 40 वर्ष जूनी असुन पुढील धोका पाहता पालिकेने इमारत खाली करण्याचे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या