झावबा वाडीच्या “पट्याच्या” माहित नसलेल्या गोष्टी.

  •  प्रदीप पटवर्धन हे गिरगावचा शाहरुख होते. त्याकाळात त्यांना प्रचंड फॅन फॉलोईंग होते.. आणि तेही मुलींचे. अगदी महाविद्यालयातही प्रदीप पटवर्धन मुलींमध्ये खूप लोकप्रिय होते. ते लेडी किलर म्हणूनच ओळखले जायचे.
  • नृत्य ही प्रदीप पटवर्धनांची जमेची आणि आवडीची बाजू. विशेषत: गोकुळाष्टमीच्या दिवशी गिरगावच्या गोविंदामध्ये प्रदीपना नाचण्यासाठी खास बोलावणे असायचे. आज सलमान – शाहरुखला पाहण्यासाठी जेवढी गर्दी होते त्याहून जास्त गर्दी प्रदीपचा नाच पाहण्यासाठी होत असे. सगळे रस्ते, चाळीच्या गॅलऱ्या गच्च भरलेल्या असायच्या.
  • प्रदीपना गोविंदामध्ये  नाचायला खूप आवडायचे. त्यातही कच्छी बाज्यावर नाचायला खूप आवडायचे. ही आवड त्यांनी शेवटपर्यंत जपली होती. एकदा नाचत असताना अचानक चौथ्या मजल्यावरून एक पिशवी त्यांच्याकडे खाली आली, त्यात त्यांच्यासाठी जिलबी आणि बर्फी होती.
  •  प्रदीप आपल्या आईचे श्रावण बाळ होते. नाटक हा त्यांचा आत्मा. शाळेपासून नाटकांतून काम करण्याची आवड. पहिली ते सातवी ते शाळेत अत्यंत हुशार होते. पण पुढे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागले. पण आईने कान उपटल्यानंतर मात्र प्रदीपनी शिक्षण पूर्ण केले. बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवली आणि शेवटपर्यंत ती नोकरी केली. आईचा शब्द त्यांनी कधी खाली पडू दिला नाही.
  •  आईने सांगितलेल्या गोष्टी त्यांनी आयुष्यभर पाळल्या, ” नोकरी कधी सोडायची नाही, नाटक सोडायचे नाही, लोकांना हावाने सोडायचे नाही.”
  •  प्रदीपनी कायम सकाळी ६ ते ९ या वेळात नोकरी केली. नंतर ते नाटकाच्या दौऱ्यावर जायचे. अगदी रात्री कितीही उशीर झाला तरी सकाळी ६ वाजता कामावर हजार व्हायचे.
  •  प्रदीप नेहमी बस आणि ट्रेनने फिरायचे. यावर ते सांगायचे मी सामान्य माणूस आहे. कलाकार स्टेजवर आहे. आणि बस, ट्रेनमध्ये माणसे भेटतात. विशेषत: चौथी सीट त्यांना बसायला फार आवडायची. तिथे बसून माणसांचे खरे चेहरे समजतात असे ते सांगायचे.
  •  १९९० साली प्रदीप मृच्छकटिक ही संस्कृत मालिका करत होते. ते शर्विलकाची भूमिका करत होते. त्यात त्यांना सहा फुटावरून उडी मारायची होती. प्रत्यक्ष शोर्टच्या वेळी उडी मारताना घोट्याला जबरदस्त दुखापत झाली आणि दीड वर्षं घरी बसावे लागले. आणि मोरूच्या मावशीमधून ब्रेक घ्यावा लागला.