प्रदीप सावंत रिटायर्ड!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंडरवर्ल्ड व अतिरेक्यांचे कंबरडे मोडणारे धडाडीचे पोलीस उपायुक्त प्रदीप भालचंद्र सावंत हे आज सेवानिवृत्त झाले. मुंबई गुन्हे शाखेच्या संरक्षण विभागातील त्यांच्या सहकाऱयांनी आज त्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला.

1986 साली महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक म्हणून भरती झालेल्या प्रदीप सावंत यांची 1998 साली मुंबई डिटेक्शन क्राइम ब्रँचमध्ये नियुक्ती झाल्यावर त्यांनी मुंबईतील गँगवॉर मोडून काढले होते. अतिरेकी कारवायांना आळा घातला होता. असा हा धडाकेबाज अधिकारी आपल्या 34 वर्षांच्या सेवेनंतर शुक्रवारी निवृत्त झाला. त्याचबरोबर माहीम डिव्हिजनचे एसीपी आदिनाथ सातपुते आणि पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे हेदेखील आज सेवानिवृत्त झाले.