चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा विधानसभा लढवणार , राजीनामा अखेर मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pradip sharma mumbai police encounter cop

शंभरच्यावर चकमकीत भाग घेऊन अंडरवर्ल्डमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे पोलीस निरीक्षक प्रदीप रामेश्वर शर्मा यांनी दिलेला राजीनामा गृह विभागाने मंजूर केला असून शर्मा यांचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रदीप शर्मा हे नालासोपारा मतदारसंघातून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शर्मा हे 1983 च्या बॅचचे पोलीस अधिकारी असून त्यांनी शंभरहून अधिक गुंडांना चकमकीत ठार मारले आहे. दाऊद, छोटा राजन आदी टोळ्यांचे शर्मा यांनी कंबरडे मोडले होते. दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला शर्मा यांनीच अटक करून त्याच्यावर मोक्काची कारवाई केली होती. प्रदीप शर्मा हे सध्या ठाणे शहर पोलीसच्या खंडणीविरोधी पथकात कार्यरत आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचमध्ये असतानाही शर्मा यांनी पाकिस्तानी अतिरेक्यांना चकमकीत कंठस्नान घातले होते. अंधेरी येथे पीएस फाऊंडेशनच्या वतीने शर्मा हजारो गरीब व गरजूंना मदत करीत असतात. त्यामुळेच त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.