मोहोळमध्ये अपघात; कल्याणमधील चौघांचा मृत्यू, अक्कलकोट येथे दर्शनासाठी जाताना काळाचा घाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण (मुंबई) येथून अक्कलकोट येथे दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. सोलापूर-पुणे महामार्गावरील वडाचीवाडी गावाच्या हद्दीत कार आणि पंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आठ वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.

पार्थ भारंबे (8), विलास भारंबे (66) आणि शोभा भारंबे (63) पूनम भारंबे (38) अशी मृतांची नावे आहेत. तर तुषार भारंबे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास शेटफळ ते तेलंगवाडी दरम्यान वडाचीवाडी गावाच्या हद्दीत हा अपघात घडला.