
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, यासह विविध मागण्यांसाङ्गी प्रहार जनशक्तीने गुरुवारी राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केले. कर्जमुक्तीच्या आश्वासनाचा विसर पडलेल्या महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकच्या आडगाव नाका येथे सकाळी ठिय्या मांडण्यात आला. विधानसभा निवडणुकीवेळी सातबारा कोरा करू, असे आश्वासन महायुतीने शेतकऱयांना दिले होते. मात्र आता सरकारने झोपेचे सोंग घेतले असल्याने तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. मेहेर सिग्नल येथेही पक्षाने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. चांदवड चौफुली येथे महामार्ग रोखला. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सटाणा, निफाड, नांदगाव येथे, तसेच येवला तालुक्यातील पुरणगाव, अंदरसूल येथेही आंदोलन करून कर्जमुक्ती आणि कांद्याला हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली.
कळवणच्या बस स्थानक परिसरात चक्काजाम करून सरकारला कर्जमुक्तीची आठवण करून देण्यात आली. त्वरित मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यात प्रहारचे तालुकाप्रमुख सुभाष पगार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ, छावाचे प्रदीप पगार, कांदा उत्पादक संघटनेचे विलास रौंदळ, रामा पाटील, बाळासाहेब शेवाळे, रामकृष्ण जाधव, काशिनाथ गुंजाळ, अजय पगार, सागर पगार, सुधाकर पगार, नरेश पगार आदींसह शेतकरी मोङ्गय़ा संख्येने सहभागी होते. देवळा शहरातील पाचपंदील येथे दोन तास आंदोलनाचा पवित्रा उचलण्यात आला. शेतकरी प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱया सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यात प्रहारचे कृष्णा जाधव, हरिसिंग ङ्खोके, विनोद आहेर आदी सहभागी होते.