फडणवीस हे महाराष्ट्राचे ज्योतिषी; सरकार कधी पडणार त्यांनाच माहीत! प्रकाश आंबेडकरांकडून भाजपची खिल्ली

1873
prakash-ambedkar

राज्यातील महाविकास आघाडीच्या स्थिरतेबाबत भाजपकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप नेत्यांची चांगलीच खिल्ली उडविली. ‘देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे ज्योतिषी आहेत. राज्यातले सरकार कधी पडणार, हे त्यांनाच माहीत,’ असा चिमटा आंबेडकर यांनी काढला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचे नेते कधी सरकार पडणार, तर कधी आम्हाला सरकार पाडण्याची घाई नाही, अशी जनतेत संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये सातत्याने करीत आहेत. याचा चांगलाच समाचार प्रकाश आंबेडकर यांनी घेतला. ‘मला यातील एबीसीडीही माहीत नाही. देवेंद्र फडणवीस यांची माणसे आहेत तेथे. त्यामुळे त्यांना माहिती मिळते. फडणवीस हे महाराष्ट्राचे ज्योतिषी आहेत. ते तारीख आणि वेळही सांगतील. त्यांना पाच वर्षांनंतर घरी बसावे लागेल, असे स्वप्नातही वाटले नसेल,’ असा टोला आंबेडकर यांनी लगाविला.

आपली प्रतिक्रिया द्या