प्रणव मुखर्जी अत्यवस्थ

334

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले आहे. मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक असून ते कोमात असल्याची माहिती आर्मी रुग्णालयाने दिली आहे.

प्रणव मुखर्जी यांना 10 ऑगस्टला दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीकर शस्त्रक्रिया करण्यात आली. एक दिवस आधीच करण्यात आलेली त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झालेली नाही. आता ते कोमात गेले आहेत, असे आर्मी रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या