…म्हणून छोट्या पडद्यावर केले कमबॅक

हिंदी टेलिव्हिजनमधून आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे चक्क 11 वर्षांनी झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या आगामी मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे.

पुन्हा मालिकेमध्ये पदार्पणाबद्दल प्रार्थना म्हणते, ‘मला गेली अनेक वर्ष खूप मालिकांच्या ऑफर आल्या. परंतु, तेव्हा मी फक्त चित्रपट करायचं ठरवलं होतं. मी जाणूनबुजून मालिकांना नकार देत गेले. परंतु, आता जवळपास दोन वर्ष माझा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. मला चाहते वारंवार एकच प्रश्न विचारताय की तुमचा पुढचा चित्रपट कधी येणार. त्यावर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी कुठे गायब आहे,’ पुढे प्रार्थना म्हणाली, ‘यावरून मला एक कळालं, चाहते आपल्याला पाहायला उत्सुक असतात. परंतु, जेव्हा तुम्ही सगळ्यांच्या दृष्टीआड होता तेव्हा तुम्ही इतरांच्या डोक्यातूनही निघून जाता. तुम्ही काय करता याचा कोणाला फारसा फरक पडत नाही. त्यामुळे इथे तुम्हाला तुमच्या असण्याची समोरच्याला जाणीव करून द्यावी लागते. मी प्रेक्षकांच्या विस्मरणात जाऊ नये म्हणून मी मालिका करण्याचा निर्णय घेतला.’ मालिकेत प्रार्थनासोबत लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहे. 23 ऑगस्टपासून मालिका भेटीला येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या