प्रशांत कणेरकर आत्महत्या प्रकरण,आरोपींना जामीन फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर आत्महत्या प्रकरणात राज्य गुप्तवार्ता विभागातील तीन पोलीस अधिकाऱ्यांनी केलेले अटकपूर्व जामीन अर्ज अलिबाग सत्र न्यायालयाने फेटाळले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांनी 16 ऑगस्ट रोजी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी आता राज्य गुप्त वार्ता विभागातील सहा पोलीस अधिकाऱ्यांविरोधात संगनमताने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रशांत कणेरकर यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारी नुसार अलिबाग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात आरोपी असलेल्या राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी विजय बनसोडे, रविंद्र साळवी, प्रशांत लांगी यांनी अलिबाग सत्र न्यायालयात धाव घेतली होती. 9 सप्टेंबर रोजी तिघांनी अटक पुर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस एम बुक्के यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्याने या प्रकरणातील सर्व सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे