Bihar election 2025 – प्रशांत किशोर  यांची निवडणूक रिंगणातून माघार

बिहारमधील जन सुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. पक्ष बांधणी आणि प्रचारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

राजकीय रणनीतीकार अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी मागील वर्षी जन सुराज्य पक्षाची स्थापना केली. बिहारमध्ये सुशासन आणणे हे त्यांच्या पक्षाचे ध्येय आहे. हा पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. प्रशांत किशोर हे स्वतः राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या विरोधात राघोपूर मतदारसंघातून शड्डू ठोकणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आज त्यांनी अचानक माघार घेतली. हा पक्षाचा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तेजस्वी यादव यांचा अर्ज दाखल

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी वैशाली जिह्यातील राघोपूर मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.