ही वेळ निवडणूक नव्हे, तर कोरोनाशी लढण्याची, प्रशांत किशोर यांचा नितीशकुमार यांना टोला

642

विधानसभा निवडणुकांची घाई करून राज्यातील जनतेच्या जिवाशी खेळू नका. ही वेळ निवडणूक लढण्याची नाही, तर कोरोनाशा लढण्याची आहे, असा टोला निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लगावला आहे.

देशातील अन्य राज्यांप्रमाणे बिहारमध्ये देखील कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र अशावेळी सरकारी यंत्रणेचा मोठा भाग हा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. निवडणुकीच्या नादात लोकांच्या आरोग्याशी खेळून त्यांचा जीव धोक्यात घालू नका, असे प्रशांत किशोर यांनी ट्विट करत म्हटले आहे.
बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने अद्याप याबाबत घोषणा केलेली नसली तरी प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे कोरोनासंदर्भात करण्यात येणाऱया उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष वेधत यापूर्वी लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान आणि राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनीही निवडणुकांची घाई करण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या