दगडू नव्हे जग्गू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘टाईमपास’मधील दगडू या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता प्रथमेश परब आता नव्या भूमिकेतून ‘ओह माय घोस्ट’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात तो जग्गू नावाच्या अनाथ युवकाची भूमिका साकारणार आहे, ज्याला हताश मनःस्थितीत असताना स्वप्नात भूते दिसू लागतात.

हॉरर कॉमेडी जॉनर असलेल्या या चित्रपटाची निर्मिती ‘जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘फिल्मोशन पिक्चर्स’च्या बॅनरखाली सना वसिम खान आणि रोहनदीप सिंह यांनी केली आहे. हा चित्रपट 12 फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. यात प्रथमेशसोबत काजल शर्मा, पंकज विष्णू, पुरूस देबू, प्रेम गाढवी, दीपाली पाटील आणि अपूर्वा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.